अहमदाबाद : अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर नडियादजवळ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मागून भरधाव वेगाने येणा-या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती.