24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरशेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक

पंढरपूर : ‘शेअर ट्रेडींग’ च्या नावाखाली पंढरपुरातील बांधकाम अभियंत्याची ४ लाख ९५ हजारांची ‘ऑनलाईन’ फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकजणाविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

विनोद कावळे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. शशांक बाबासाहेब कांबळे (रा. पंढरपूर) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. कांबळे हे खासगी बांधकाम अभियंता म्हणून व्यवसाय करतात. दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘अलियांझ ग्लोबल इन्व्हेस्टर्स’ या शेअर ट्रेडिंग संस्थेत ते आपल्या इन्स्टाग्राम अ‍ॅपवरून सहभागी झाले. त्यावरून मिळालेल्या सुचनांनुसार त्यांनी काही दिवस शेअर्सची खरेदी व विक्री केली. त्यानंतर सदर संस्थेतर्फे ‘ब्लॉक ट्रेडींग’ व ‘आयपीओ’ या नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आल्याने कांबळे हे त्यात सहभागी झाले. त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे लिंक पाठवून शेअर ट्रेडींगचे सॉफ्टवेअर घ्यायला लावण्यात आले. त्यावर देण्यात आलेल्या बँक खात्यात कांबळे यांनी शेअर ट्रेडींगसाठी वेळोवेळी स्वत:च्या खात्यातून एकूण ४ लाख ९५ हजार रूपये ऑनलाईन पाठविले.

दि. २० मार्च पर्यंत कांबळे यांच्या शेअर ट्रेडींग अ‍ॅपवरील खात्यात नफा व मुद्दल असे एकूण १४ लाख ४२ हजार ६४३ रूपये जमा दिसत होते. दरम्यान, त्या दिवशी प्रत्येक ट्रेडवर २० टक्के सेवा कर आकारणार असल्याचे कळविल्यानंतर कांबळे यांनी असमर्थता दर्शविली. तसेच ही रक्कम मिळविण्यासाठी अगोदर आणखी २ लाख ८८ हजार ५२८ रूपये भरण्यास सांगण्यात आले. त्याशिवाय जमा रक्कम देणार नसल्याचे संबंधित संस्थेचा सहाय्यक विनोद कावळे याने कांबळे यांना सांगितले. या प्रकारामुळे अखेर कांबळे यांनी आपली फसवणूक झाल्याबाबतची फिर्याद दाखल केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR