लातूर : प्रतिनिधी
गेली पधंरा दिवसापासून ढगाळ वातावरणासह लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पन्नावर झाला आहे. पावसामुळे शेतातील भाजीपाला काही प्रमाणात खराब झाला आहे. त्यातच ग्रामीन भागात पाण्या अभावी भाजीपाला करपुन जात असल्याचे दिसून येत आहे. लातूर बाजार समितीत येणारी भाजीपाल्याची आवक मागील काही दिवसापासून चांगलीच घटल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याभरात भाजीपाल्याला पिकाला पुरेल असे पाणी नसल्याने लातूर जिल्ह्यासह ग्रामीन भागातून बाजारात दाखल होण्या-या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटली असून काही भाजीपाल्याच्या दरात अलपक्ष वाढ झाली आहे. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या दरात २० ते ३० रुपयांनी वाढ झाली असून, काही दिवसानंतर सर्वच पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. शहरातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्यांच्या दरात मागील आठवड्यापासून अल्पक्ष वाढ झाली असल्याचे व्यापारी मिणाझ बागवान यांनी सागीतले आहे. आवकाळी पाऊसासह आता पाणी टंचाईची झळा जानवू लागल्यामुळे जिल्हयातील पालेभाज्यांचे पिक घेणा-या शेतकरी संकटात सापडला आहे.
शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत येणा-या भाजीपाल्याची आवकही प्रती दहा किलोप्रमाणे भाव मिळाला आहे. यात वागें १४ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, भेंडी ३९ किंव्टल आवक होवून २५० रूपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी ४ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, फुल गोभी ६१ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण १०० किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे १२० किंव्टल आवक होवून १०० रूपयांचा दर मिळाला, गवार १२ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, गाजर १ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, भोपळा २२ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, कोथिंबीर ६३ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, हिरवी मिरची ३० किंव्टल आवक होवून ५०० रूपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची २० किंव्टल आवक होवून ३२० रूपयांचा दर मिळाला, वरणा ४ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, शेवगा ६८ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, मेथी १५ किंव्टल आवक होवून ७०० रूपयांचा दर मिळाला, कांदापात ९ किंव्टल आवक होवून ५०० रूपयांचा दर मिळाला, लिंबु १५ किंव्टल आवक होवून ५०० रूपयांचा दर मिळाला, काकडी १६ किंव्टल आवक होवून २२० रूपयांचा दर मिळाला आहे.