जळगाव : राज्यात गाजलेल्या खटल्यातील माजी सरकारी वकीलावर चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साक्षीदारला धमकी देऊन चार कोटी रुपयांची मागणी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
तुला जिवंत रहायचे असेल तर अॅड. प्रवीण चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी द्यावे लागतील, अशी धमकी दिली गेली. या प्रकरणी माजी सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, त्यांचा पुत्र आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर रोजी आणि त्यापूर्वी एकदा हा प्रकार घडला होता.