21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलेला बेदम मारहाण

महिलेला बेदम मारहाण

नवी मुंबई : केवळ नव्या, फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून एका महिलेला तिच्या सासरच्यांनी आणि नव-यानेही मारहाण केली. नवी मुंबईतील दिघा येथे ही अतिशय भयानक आणि अंगावर कापरे आणेल अशी घटना घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी नवरा आणि सासरचे लोक, अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

२३ वर्षीय विवाहीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीनुसार, पीडितेचा पती प्रदीप अरकडे (३०) हा फॅशनेबल बांगड्या घालण्याच्या विरोधात होता आणि या मुद्द्यावरून त्याने पीडितेशी वाद घातला.

१३ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. त्या दिवशी पीडित महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या ५० वर्षीय सासूने तिचे केस धरून ओढले आणि तिला अनेकवेळा थोबाडीतही मारली. तिचा पतीही या मारहाणीत सामील होता, त्याने पीडितेला बेल्टने अमानुषपणे मारहाण केली. हे सगळं घडत असताना तिचे सासरचे इतर नातेवाईकही उपस्थित होते. असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR