24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरविद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत संभ्रमावस्था

विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत संभ्रमावस्था

लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारने यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी कपडा देऊन तो शाळास्तरावर महिला बचत गटांकडून शिऊन घेण्याची जबाबदारी देण्याचे सुतोवाच केल्याने शिक्षक सध्या संभ्रमावस्तेत आहेत. अजूनही गणवेशाचा कपडा शाळेपर्यंत पोचलेला नाही. विद्यार्थी गणवेशासंबंधातली कार्यवाही संथ असल्याने कमी वेळेत गणवेश शिऊन कसा मिळेत, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
ऐनवेळी विद्यार्थ्यंच्या गणवेशाचा कपडा मिळाला तर तो शिऊन कधी घ्यायचा?, असा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे. सरकारनेच जिल्हा परिषद  शाळांतील विद्यार्थ्यांचा गणवेश शिऊन द्यावा, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे. जिल्हा परिषद शाळा सुरु होण्यास जेमतेम एक महिना शिल्लक राहिला आहे. एक महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश शिऊन घेणे शक्य होईल का?, तसेच ज्या महिला बचत गटांना गणवेश शिऊन देण्याचे कंत्राट दिले जाणार आहे त्या गटाकडे मुबलक सामग्री असेल का?, असे एक ना अनेक प्रश्न शिक्षकांसमोर उभे राहणार आहेत.
सरकारने किमान लवकरात लवकर कपडा देऊन ते शिऊन देण्याचे काम कोण्या बचत गटाला द्यायचे, याबद्दल मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. या संबंधात सरकारकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा कपडा प्राप्त होत नसल्याने आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लगेल का, असे शिक्षकांना वाटू लागले आहे. सरकारने अध्यादेश काढून गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. याबाबत त्या अध्यादेशात सूचनाही करण्यात आल्या आहेत. पण कपडा देण्याचा व तो शिऊन घेण्याचा कार्यक्रम स्पष्ट नमुद नाही. सरकारने गणवेशाबद्दल लवकरात लवकर धोरण ठरवून त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR