25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणीबालरंगोत्सव बालनाट्य प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बालरंगोत्सव बालनाट्य प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : यश चॅरिटेबल ट्रस्ट परभणी, बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा परभणी व परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी द्वारे आयोजित बालरंगोत्सव बालनाट्य शिबिर दि.६ ते १० मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी धमाल केली विविध प्रकारची नाट्य सादरीकरण केले.

या शिबिराचे उद्घाटन परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संचालक डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले. या शिबिरात मुलांच्या क्षमता विकसन व व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक दिग्गज कलावंतांनी हजेरी लावून मार्गदर्शन केले. या शिबिरात पुण्याहून ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. देवदत्त पाठक यांनी मुलांच्या क्षमता विकासांना संदर्भात निरीक्षण क्षमता, भावभावना, नवरसाची निर्मिती रंगमंचीय खेळातून जाणीव करून दिली. डॉ. अर्चना चिक्षे यांनी उच्चार शास्त्र, शब्द फेक, बोलण्याची शैली यांचा सराव करून घेतला. सिने तंत्रज्ञ, लेखक तथा दिग्दर्शक गोपी मुंडे यांनी रंगमंचावरील अभिनय व कॅमेºयासमोरील अभिनय कशा पद्धतीने करावा लागतो हे प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगितले.

शिबिराच्या शेवटी नाट्यकलावंत किशोर पुराणिक यांनी अभिनयामधील भाव-भावनानुसार अभिनयातील वैविध्य विद्यार्थ्यांना शिकवले. डॉ. सिद्धार्थ मस्के यांनी एखादे नाट्य सादर करताना होणाºया चुकांची जाणीव करून दिली व महाराष्ट्राच्या विविध लोकनृत्य विषयी प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली. बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ परभणी तसेच राजीव गांधी युवा फोरम परभणी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या पाच दिवशीय शिबिरात विद्यार्थ्यांनी भरपूर धम्माल करून छोटी छोटी नाट्यछटा सादर केल्या. समारोपीय कार्यक्रमात किशोर पुराणिक, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, मधुकर उमरीकर, त्र्यंबक वडसकर, सुधीर सोनुनकर, प्रकाश बारबींड हे सहभागी झाले व या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिद्धार्थ मस्के, त्र्यंबक वडसकर, सुधीर सोनुनकर, मारुती वाघमारे, देविदास शिंपले, दत्ता बनसोडे, प्रकाश पंडित, सुप्रिया श्रीमाळी, छाया गायकवाड, सपना वैष्णव आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR