लातूर : प्रतिनिधी
दयानंद वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेत विविध राज्यातून आणि इतर देशांतून संशोधक, प्राध्यापक आणि मान्यवर सहभागी झाले होते. बिल्डिंग अ सस्टेनेबल वर्ल्ड : एसडीजी इन कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स अँड आयटी या विषयावर ही परिषद संपन्न झाली.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाराम पवार होते. सकाळच्या पहिल्या सत्रात जळगाव येथील एआरबी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम साळुंखे यांचाही सहभाग होता. दुपारी टेक्निकल सेशन संपन्न झाले. या सत्रात हैद्राबाद विद्यापीठातील डॉ. पूनम सिंग यांनी मार्गदर्शन केले. यानंतर एकूण सहभागी झालेल्या पैकी १५ जणांनी आपले संशोधन लेख सादर केले. दिवसभरात झालेल्या एकूण विविध क्षेत्रात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. सकाळच्या सत्रात साऊथ आफ्रिका येथील इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट सायन्स नॉर्थ वेस्ट यूनिवर्सिटी येथील सहयोगी प्रा. डॉ. अंकित कत्रोडिया यांनी मार्गदर्शन केले. इंडियन कॉमर्स असोसिएशनचे सचिव डॉ. कुलदीप शर्मा, कलबुर्गी कर्नाटक गुलबर्गा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. लक्ष्मण राजनाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सांभाजीनगर येथील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. सय्यद अझरुद्दीन, वाणिज्य विभाग नांदेड विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. डी.एम. खंदारे, सहभागी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समारोप सत्रात दक्षिण दिनाजपूर विश्वविद्यालय प. बंगाल येथील कुलगुरू डॉ. देबब्रता मित्रा यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. मनिषा अष्टेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी कळंबे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आकांक्षा भांजी यांनी तर शेवटी आभार डॉ. लक्ष्मीकांत सोनी यांनी मानले. सदर परिषद ही ऑनलाईन पार पडली. परिषदेच्या यशस्वितेसाठी डॉ. खदीर शेख, प्रा. प्रेमसागर मुंदडा, प्रा. योगेश शर्मा, प्रा. लहू शेंडगे, प्रा.अक्षय पवार, प्रा. स्वप्नाली माणिकशेट्टी, प्रा. शितल नाईक, प्रा. डी. व्ही. शर्मा, केतन गायकवाड, पवन शर्मा आदींनी परिश्रम घेतले.