25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रघाटकोपर पेट्रोल पंप, होर्डिंगमधून वर्षाला ५० कोटी रूपयांची कमाई

घाटकोपर पेट्रोल पंप, होर्डिंगमधून वर्षाला ५० कोटी रूपयांची कमाई

घाटकोपर : येथील छेडा नगरमध्ये सोमवारी दुर्घटना घडली. या ठिकाणी पेट्रोल पंपावर असलेल्या १२० बाय १२० फुटांचे भलेमोठ होर्डिंग कोसळले. या घटनेस चार दिवस उलटून गेले आहेत, तरीही मलाबा उचलण्याचे काम पूर्ण झाले नाही. या घटनेत आतापर्यंत १६ जणांनी प्राण गमावले आहेत.

या होर्डिंग दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगमधून वर्षाला ५० कोटींची कमाई होत होती. त्यात मातोश्रीचा आणि भांडुपचा हिस्सा किती होता? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे.

घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगच्या जाहिरात फलकाची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हाऊसिंग सोसायटीची आहे. परंतु २०२०-२०२१ मध्ये तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारने बेकायदेशीररित्या लॉर्डस मार्क इंडस्ट्रिज लि. या खाजगी कंपनीला पेट्रोल पंप दिला. तसेच या जागेवर होर्डिंग लावण्याचे कंत्राट भावेश भिंडे यांच्या मे. इगो मेडीया प्रा. लि. कंपनीला दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई २५ कोटी होती. तसेच होर्डिंगची वार्षिक कमाई २५ कोटी होती.

 

रेल्वे पोलिसांच्या जागेत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. या चारही होर्डिंगसाठी इगो मीडिया ‘जीआरपी’ला वर्षाला २४ लाख रुपये भाड्यापोटी द्यायचे. त्याशिवाय डिपॉझिट म्हणून ४० लाख रुपये भरले होते. भाड्यातून जमा होणारा हा सर्व पैसा जीआरपी कल्याण निधीमध्ये जमा व्हायचा. होर्डिंगच्या माध्यमातून जीआरपी वेलफेअर फंडासाठी निधी उभारायचा होता. म्हणून जीआरपीने ऑक्टोबर २०२० मध्ये होर्डिंगसाठी निविदा काढल्या होत्या. इगो मीडियाने सर्वाधिक बोली लावली म्हणून जीआरपीने होर्डिंग लावण्याची परवानगी त्यांना दिली. तीन होर्डिंग २०२१ मध्ये लावण्यात आले. चौथ होर्डिंग जे कोसळले, ते २०२२ मध्ये लावण्यात आले होते.

भावेश भिंडेच्या हाती शिवबंधन : भावेश भिंडेला आमदार सुनील राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. त्याला शिवबंधन बांधले होते. त्यामुळे पेट्रोल पंप आणि होर्डिंगमधून मिळणा-या ५० कोटींतून मातोश्रीला किती पैसे जातात आणि भांडूपला किती पैसे येतात याचा हिशोब द्यावाच लागणार असल्याचे किरटी सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR