लातूर : प्रतिनिधी
मान्सूनपुर्व वीजयंत्रणेच्या तातडीच्या दुरुस्ती व देखभाली करिता लातूर शहरातील शारदानगर व बांधकाम भवन वीजवाहिनीवरील काही भागांचा वीजपुरवठा आज दि. १८ मे सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहील. संबंधीत वीजग्राहकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शाखा क्रमाक-३ कार्यालयाअंतर्गत येणा-या ११ केव्ही शारदानगर वीजवाहिनीच्या मान्सुनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन रेणापूर नाका परिसरातील पश्चिमेचा परिसर, बिसेननगर, मयुरबन, मैत्री पार्क, मेघा सिटी, अजिंक्य सिटी, रामचंद्रनगर, वनमाळी बालाजी मंदिर शेजारील भाग, यशोदा टॉकीज शेजारील भाग, बेळंबे नगर, बिर्ला शाळा तसेच उर्दू शाळेच्या शेजारील परिसरातील वीजपुरवठा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बंद राहील.
लातूर शहर शाखा क्रमांक ७ अंतर्गत येणा-या ११ केव्ही बांधकाम भवन वीजवाहिनीचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत बंद राहील. या वीजवाहिनीवरील आरजे कॉम्प्लेक्स, ड्रायव्हर कॉलनी, इंजिनिअरिंग कॉलनी, पत्तेवार कॉलनी, आदर्श कॉलनी, गणेशनगर, देशपांडे कॉलनी, जुना औसा रोड, लक्ष्मी कॉलनी, महसूल कॉलनी, विठ्ठल नगर इत्यादी भागातील वीज पुरवठा बंद राहील. वीज ग्राहकांनी याची नोंद घेवून महावितरणला सहकार्य करावे. सदर देखभाल व दुरूस्तीचे काम निर्धारीत वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास त्वरीत वीज पुरवठा पुर्ववत चालू करण्यात येईल.