25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही संविधानाचे रक्षक, आघाडीकडूनच धोका

आम्ही संविधानाचे रक्षक, आघाडीकडूनच धोका

इंडिया आघाडीच्या माओवादी मनसुब्यांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात
मुंबई : प्रतिनिधी
मोदीकडे दहा वर्षांचे रिपोर्ट कार्ड व पुढील २५ वर्षाचा आराखडा आहे. दुसरीकडे इंडी आघाडीकडे जेवढे पक्ष तेवढे पंतप्रधान, तेवढ्या घोषणा आहेत. त्यांच्या माओवादी अजेंड्यातील घोषणांची बेरीज केली तर देश दिवाळखोरीत जाईल. त्यांचे मनसुबे खतरनाक आहेत. त्यांची नजर मंदिरांच्या आणि हिंदूंच्या संपत्तीवर आहे. त्यांच्यापासून देशाच्या घटनेला, अर्थव्यवस्थेला, सुरक्षेला धोका आहे, असा घणाघाती हल्ला चढवताना देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी महायुतीला रेकॉर्ड ब्रेक मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील प्रचारसभेत केले.

गेल्या दहा वर्षात मी अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. जेव्हा जाईन तेव्हा विकसित भारत सोपवूनच जाईन, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नकली शिवसेना म्हणून जळजळीत टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईसह महाराष्ट्रातील शेवटच्या १३ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होत असून, महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त प्रचार सभा आज ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नारायण राणे, यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.

नकली शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार सोडून त्यांना धोका दिला आहे. सत्तेसाठी ते राममंदिराला शिव्या देणा-यांच्या सोबत ते गेले आहेत. ज्या कसाबने या शहरावर हल्ला केला त्याला आघाडीवाले क्लिनचीट देत आहेत. सर्जिकल स्ट्राईक करणा-या आपल्या सैन्याला खोटे ठरवत आहेत असे टीकास्त्रही त्यांनी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीवर सोडले. काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान बदलतील या आरोपांचा समाचार घेताना पंतप्रधान म्हणाले, ३७० कलम हटवणारा मोदीच संविधानाचा सर्वात मोठा रक्षक आहे, जे आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्यांनी संविधानाला अपंग केले. मी दलित, मागास वर्गाचे आरक्षण मी कधीच हटवू देणार नाही, असा इशारा मोदींनी दिला.

राज ठाकरेंच्या ७ मागण्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या धाडसी निर्णयांबद्दल प्रशंसा करताना काही अपेक्षाही व्यक्त केल्या. पहिली अपेक्षा म्हणजे गेली अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळण्याचा विषय. दुसरा विषय सव्वाशे वर्षे संपूर्ण देशावर मराठा साम्राज्य होते, त्याचा इतिहास शालेय शिक्षणात शिकवला जावा. शिवछत्रपतींची खरी स्मारके हे गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरची समिती नेमावी. या भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान उभे केले, त्याला कधीच धक्का लागणार नाही हे विरोधकांना खडसावून सांगा. या देशात कोट्यवधी देशभक्त मुसलमान आहेत. त्यांना शाश्वती हवी आहे आणि ओवेसी सारख्या अवलादी आहेत त्यांचे अड्डे तपासून घ्या. तिथे माणसे घुसवा, देशाचे सैन्य घुसवा, असे राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR