27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक

केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी आज अटक केली आहे. ‘आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना कथित मारहाण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मालीवाल यांनी पोलिसांमध्ये बिभव कुमार यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी आज मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानातून बिभव कुमार यांना ताब्यात घेतले.

दुसरीकडे स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्यातीत कथित मारहाणीचा आणखी एक व्हीडीओ समोर आला आहे, या व्हीडीओमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानातील महिला सुरक्षा अधिकारी स्वाती मालीवाल यांचा हात पकडून त्यांना बाहेर काढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाच्या सोशल मीडियावर हा व्हीडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

स्वाती मालीवाल यांनी केलेला दावा खोटा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या व्हीडीओतून ‘आप’ने केला आहे. दरम्यान यापूर्वी दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वातीने केलेले आरोप खोटे असून, मुख्यमंत्री केजरीवाल यांना बदनाम करण्यासाठी भाजपने हे षडयंत्र रचले असून, स्वाती त्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला होता.

मालीवाल यांनी तक्रारीत काय म्हटले ?
दरम्यान, आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची प्रतीक्षा करीत होते. त्यावेळी त्यांचे पीए बिभव आले आणि मला शिव्या देऊ लागले. काहीही कारण नसताना त्यांनी मला सहा-सात चापटा मारल्या. यावेळी मी आरडाओरडा केला तरीदेखील बिभवने मला पोटावर, छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR