33.2 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रमंगळवारी १२ वीचा निकाल

मंगळवारी १२ वीचा निकाल

पुणे : राज्य बोर्डाकडून मंगळवारी दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून होते. अखेर आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार मंगळवार दि. २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. ‘सीबीएसई’ परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR