28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींसह काँग्रेस नेत्यांनी वाहिली राजीव गांधी यांना श्रध्दांजली

पंतप्रधान मोदींसह काँग्रेस नेत्यांनी वाहिली राजीव गांधी यांना श्रध्दांजली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ३३वी पुण्यतिथी आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनीही ‘वीरभूमी’वर पोहोचून माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आमचे माजी पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझी श्रद्धांजली.

त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी दिल्लीतील राजीव गांधी यांच्या वीरभूमी स्मारकावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. याशिवाय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही वीरभूमीवर जाऊन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वीरभूमी येथे त्यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR