23.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeसोलापूरदुहेरी जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर

दुहेरी जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर

सोलापूर : सध्या पाच ते सहा दिवसांआड होत असलेल्या पाणीपुरवठ्याचे शुक्लकाष्ठ संपविण्यासाठी उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम ७८ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.

उजनी ते सोलापूर ही ११० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम सच्या पुष्टपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत ८५ किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली असून उर्वरित जलवाहिनी टाकण्याचे काम वेगाने चालू आहे. पूर्ण झालेल्या जलवाहिनीची अलीकडेच चाचणी घेण्यात आली, ती यशस्वीही झाली आहे. ११० किलोमीटर लांबीची ही जलवाहिनी राष्ट्रीय महामार्गाच्या जागेतून जात आहे. त्यासाठी महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला भाट्याची रक्कम म्हणून पाथ कोटी रूपये दिले आहेत. तरीही ८५ किलोमीटर जलवाहिनीच्या मार्गात काही ठिकाणी शेतकर्‍यांनी हरकती घेतल्याने तेथील काम चांगले आहे. महामार्गात संपादित जमिनीचा मोबदला राष्ट्रीय महामार्ग विधागाकडून मिळाला नसल्याचे वा शेतक-यांचे म्हणणे आहे.

महामार्ग विभाग आणि शेतक-यांमधील वाद लवकरच संपण्याची अपेक्षा असून त्यानंतर अर्थबर राहिलेले कामही लवकर पूर्णत्वास जाईल, असे चौबे यांनी सांगितले. धरणातून पाणी उपसण्यासाठी जॅकवेल उभारण्याचे कामही ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ण होत आले आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती आणि धरणात पाणी कमी असल्याने वर्षभरातच जैकवेलचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. अन्यथा या बांधकामासाठी अठरा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी गेला असता.

दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातूर पाणी उपसा सुरू होईल. पाकणी आणि चोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचे गुद्धिकरण करून शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा होईल. दोन दिवसांआड होणान्या पाणीपुरवठ्यामुळे किकळीत पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी होऊन लोकांना वेळेवर पाणी मिळेल. शहराला पुरेशा दावाने आणि नियमित पण दोन दिवसांआड पाणी मिळणार असल्याने तक्रारी कमी होतील, असा विश्वास चौबे यांनी व्यक्त केला.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या वेगवेळ्या भागात ६२ जलकुंभ आहेत. त्यातील आयुष्यमान संपलेले दहा ते बारा जलकुंभ पाहून नव्याने बांधण्यात येणार आहेत. याशिवाय अमृत २ मधून २३ जलकुंभ उभारले जाणार असून त्यासाठी सुमारे ८९२ कोटींचा निधी लागणार आहे. त्याचाही प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. उजनी धरणातील पाणी पातळी वजा ७० टक्क्यांपर्यंत घसरली तरी दुबार पंपिंग करावे लागणार नाही, असे नियोजन धरण ते पंप हाऊसपर्यंत करण्यात येत आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १५०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आहेत त्यामध्ये मुख्य जलवाहिन्या ३०० किलोमीटर लांबीच्या असून त्याचा वापर पाण्याचे वहन करून जलकुंभ भरण्यासाठी केला जातो. १२०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीच्या माध्यमातून नागरिकांच्या धराधरांपर्यंत पाणी पोहोचविले जाते. शहराच्या भागात विशेषतः विजापूर रोड आणि होटगी रोड या विस्तारित हद्दवाढ भागात काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित असून आचारसंहितेनंतर ते सुरू होईल, असे पाणीपुरवठा अधिकारी तपन डंके यांनी सांगितले.

सध्या शहराला उजनी सोलापूर, टाकळी ते सोरेगाव आणि हिप्परगा या तीन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. टाकी येधील भीमा नदी आणि औज बंधार्‍यातून पाणी संपण्याची स्थिती पाहून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाकडे विनंती आर्जव करावी लागते. शहराला वर्षभर दोन टीएमसी पाण्याची गरज भासते मात्र, चार रोटेशनमध्ये मिळून २० टीएमसी पाणी सोडल्याचे दाखवून जलसंपदा विभाग महापालिकेकडून वर्षाला १८ कोटी रुपयांची पाणीपट्टी आकारतो. दुहेरी जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर थेट धरणातून पाण्याचा उपसा सुरु होणार असल्याने नदीत पाणी सोडण्याचा विषयच राहात नाही. त्यामुळे महापालिकेला वर्षभरात १० कोटींची पाणीपट्टी येईल आणि सुमारे आठ कोटींची पाणीपट्टी वाचेल.असे सार्वजनिक आरोग्य अभियंताव्यंकटेश चौबे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR