22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरश्री त्रिपुरा रिलायन्स लातूर पॅटर्नचे १२ बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

श्री त्रिपुरा रिलायन्स लातूर पॅटर्नचे १२ बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्ड लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा श्री संगमेश्वर चारीटेबल ट्रस्ट लातूर संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९९.५६, लागला आहे. यात दिक्षित ऋत्विज हा विद्यार्थी ९३.३०, टक्के गुण घेऊन संस्थेतून प्रथम आला आहे. तसेच, तोडकरी सिद्धी ९२.००, व्दितीय, सगर पल्लवी ९०.८३, तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच नाईक हफसा  ९०.६६, शेगावकर समर्थ ९०.५०, शेटे संस्कार ९०.१६, उप्पे तन्वी ९०. ०० या विद्यार्थ्यांनी ९० % पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.
तसेच  इंग्रजी विषयामध्ये कबाडे वैष्णवी ९७, कांबळे वैष्णवी ९७, जीवशास्त्र विषयात शेगावकर समर्थ ९८, शेटे संस्कार ९६, शेख हाफिजा ९५, गणित विषयात मगर तुषार ९७, पिक शास्त्र विषयात शेख हापिजा १९९ गुण संपादित केले आहेत. इ. १० वी मध्ये गुणवत्ता पूर्ण व साधारण गुण असणा-या अशा सर्व प्रकारच्या मुलांमधून असाधारण निकाल देण्याचे कार्य संस्था मागील २१ वर्षांपासून यश्वस्वीरित्या करत आहे. त्याचेच द्योतक म्हणजे १२ वी बोर्डाचा आजचा निकाल असल्याचे प्रतिपादन श्री संगमेश्­वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना केले.
याप्रसंगी प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक ओंकार होनराव, कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजकुमार केदासे तथा प्रा. सतिष पाटील , प्रा. मुंढे मिरा, प्रा. शेख मेहराज, प्रा. कुलकर्णी प्रसाद, प्रा. मोरे अश्विनी, प्रा. तेलंग दिपमाला, प्रा. खराबे संगम, प्रा. गंगथडे शुभांगी, प्रा. फड प्रसाद, प्रा. दिवे मेघा,  श्रीराम कुलकर्णी यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR