29.7 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeराष्ट्रीयकन्हैया कुमारवर शाई फेकल्याप्रकरणी एकाला अटक

कन्हैया कुमारवर शाई फेकल्याप्रकरणी एकाला अटक

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्य दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार नवीन उस्मानपूरच्या ४ पुष्टात स्वामी सत्यनारायण भवन येथील आप कार्यालयात बैठक घेत होते. ‘आप’च्या नगरसेवक छाया शर्मा यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठक संपल्यानंतर छाया शर्मा कन्हैया कुमार यांना निरोप देण्यासाठी कार्यालयाच्या खाली आल्या तेव्हा काही लोकांनी येऊन कन्हैया कुमारना पुष्पहार घातला. पुष्पहार अर्पण केल्यानंतर काही लोकांनी त्यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी छाया शर्मा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि धमकावले.

डीसीपी नॉर्थ ईस्ट यांनी सांगितले की, छाया शर्मा यांच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई करून पुढील तपास सुरू आहे. ईशान्य दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी अजय कुमारला अटक करण्यात आल्याचे डीसीपी ईशान्य जॉय तिर्की यांनी सांगितले. १७ मे रोजी कन्हैया कुमार ‘आप’च्या कार्यालयात बैठकीसाठी आले होते. त्यावेळी शाईफेकचा प्रकार घडला होता. पोलिस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR