मुंबई : मुंबई विमानतळाने ऐतिहासिक कामगिरीसह आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) एका दिवसात विक्रमी १,६१,७६० प्रवाशांना सेवा देण्यात आली आहे. सीएसएमआयए सध्या फक्त सिंगल रनवे विमानतळ म्हणून कार्यरत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई विमानतळावरून एक हजाराहून अधिक उड्डाणांची एअर ट्रॅफिक मुव्हमेंट (एटीएम) नोंद झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी १०३२ फ्लाइटचे टेकऑफ आणि लँडिंग झाले. सीएसएमआयएसाठी ही मोठी उपलब्धी आहे. आता एका दिवसात १,६१,७६० प्रवाशांना सेवा देण्याचा विक्रम झाला आहे. मुंबई विमानतळाने पुन्हा इतिहास रचला आहे.