22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधानांच्या दौ-यातील हॉटेलचे बिल न भरल्याने कायदेशीर कारवाईचा इशारा

पंतप्रधानांच्या दौ-यातील हॉटेलचे बिल न भरल्याने कायदेशीर कारवाईचा इशारा

हॉटेलचे बील ८० लाख रुपये

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या वर्षी म्हैसूरच्या दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते, त्या हॉटेलचे बिल अद्याप बाकी आहे. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण, वन तसेच हवामान बदल मंत्रालयाद्वारे प्रोजेक्ट टायगर उपक्रमाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसूरमध्ये उपस्थित होते. त्यांनी हॉटेल रेडिसन ब्लू प्लाझामध्ये वास्तव्य केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते ११ एप्रिलपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राज्याच्या वन विभागाला ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते.

केंद्राकडून शंभर टक्के निधी मिळण्याचे आश्वासन वन विभागाला मिळालेले होते. हा कार्यक्रम पर्यावरण आणि वन मंत्रालय तसेच एनडीसीएच्या वरिष्ठ अधिका-यांच्या निर्देशानुसार शॉर्ट नोटिशीच्या आधारावर आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचा एकूण खर्च ६.३३ कोटी रुपये इतका होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR