24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात हुडहुडी वाढणार

महाराष्ट्रात हुडहुडी वाढणार

पुणे : राज्यात यंदा मान्सूनने सरासरी गाठली नाही. चार वर्षांनंतर यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आता ऑक्टोबर महिना संपण्यास दोन, तीन दिवस असताना राज्यातील अनेक शहरांचे तापमान घसरले आहे. राज्यातील सर्वांत हॉट सीट म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराचे तापमान घसरले आहे. जळगावात सर्वांत कमी तापमानाची नोंद ११.४ अंश सेल्सिअस झाली आहे. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान जास्त आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सर्वांत जास्त तापमान रत्नागिरी शहराचे होते. रत्नागिरीत कमाल तापमान ३६.७ अंश सेल्सिअस होते. आता राज्यातील तापमानात घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईच्या तापमानात घसरण
मुंबई शहराचे किमान तापमान घसरले आहे. मुंबईचे तापमान २४.२ अंशावर तर कमाल तापमान ३५.६ अंशावर आले आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे मुंबईकरांना सकाळी, सकाळी गारवा जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४ अंशावर आले आहे. राज्यात जळगावात तापमानाचा नीचांक होता. जळगाव शहराचे कमाल तापमान ३४.७ तर किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअस होते.

किमान पारा घसरला
राज्यातील अनेक शहरांत गेल्या पाच-सहा दिवसांपासून तापमानाचा किमान पारा घसरत आहे. परंतु दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. रात्री तापमानात घट झाली आहे. रात्रीच्या वेळेस बोचरी थंडी पडत आहे. पहाटे चार ते सात वाजेदरम्यान वातावरणात चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होणार आहे. यामुळे स्वेटर, जॅकेटचा वापर होऊ लागला आहे. पुढील चार दिवसांत पुण्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. राज्यातील तापमानात घसरण होणार असल्याचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR