24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयहत्या प्रकरणातून गुरमीत राम रहिमची निर्दोष मुक्तता

हत्या प्रकरणातून गुरमीत राम रहिमची निर्दोष मुक्तता

हरयाणा : डेरा सच्चा सौदा गुरुमीत राम रहिमच्या यांच्या संदर्भातील प्रकरणात न्यालायाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बाबा गुरमीत राम रहीमसह चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने याबाबतच निर्णय दिला आहे. राम रहिमने सीबीआय न्यायालयाच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करत हायकोर्टाने हत्याप्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता केली. २२ वर्षांपूर्वीच्या या खटल्यात १९ वर्षानंतर न्यायालयाने राम रहिमसह ५ जणांची मुक्तता केली.

बलात्कार आणि दोन जणांची हत्या केल्याप्रकरणी २००९ मध्ये सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिम आणि इतर ४ जणांना दोषी ठरुन शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, १८ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयाने राम रहिमसह इतर चौघांना रंजीत सिंह हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासंदर्भाने, राम रहिमने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज हायकोर्टाने राम रहिमसह चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपी अवतार सिंह, कृष्णलाल, जसबीर सिंह आणि सबदिल सिंह यांनाही न्यायालायने शिक्षेतून मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, एका आरोपीचा कोर्ट ट्रायल सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. बलात्कार आणि पत्रकार हत्या प्रकरणात राम रहिमचे अपली उच्च न्यायलयात अद्याप प्रलंबित आहे. सध्या राम रहिम रोहतक येथील तुरुंगात आहे.

सन २००२ सालचे हत्याप्रकरण
सन २००२ साली डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्य असलेल्या रंजीत सिंहची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रणजीत सिंहने साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात निनावे चिठ्ठी आपल्या बहिणीकडून लिहून घेतली होती. यासंदर्भाने पोलिस तपासावर नाराज असलेल्या रंजीत सिंहच्या मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. सीबीआय तपासात राम रहिमसह ५ आरोपींना दोषी ठरवून सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. सन २००७ मध्ये कोर्टाने आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR