लातूर : प्रतिनिधी
पंजाब येथील रिगी पब्लिकेशनद्वारा सचिन लक्ष्मणराव झोले संपादित बेस्ट स्टॉप या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळयास पुस्तकांचे लेखक सचिन झोले, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, मजूर फेडरेशन माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, विद्याताई पाटील, दयानंद बिडवे, माजी सभापती जितेंद्र स्वामी, बालाजी सुरवसे, सतीश पाटील, आशादुल्ला सय्यद आदी उपस्थित होते.
या पुस्तकात वातावरणीय बदल, जागतिक तापमान वाढ, वाहतुकीचे अपघात, महागाई, प्रदूषण, सामाजिकदरी या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बेस्ट स्टॉप हे प्रोजेक्ट संपूर्ण जगभर कार्यान्वीत झाल्यास पेट्रोल व डिझेल १ रूपये होईल असे लेखकांचे म्हणणे आहे. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बेस्ट स्टॉप हे पुस्तक सर्वांनी घ्यावे, यात विविध विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली असून, त्या बद्दल सचिन झोले यांचे कौतुक केले आहे.