25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रटॅगिंगशिवाय जनावरांची खरेदी-विक्री होणार बंद!

टॅगिंगशिवाय जनावरांची खरेदी-विक्री होणार बंद!

१ जूनपासून नियम लागू, जनावरांच्या कानाला टॅग लावणे आता बंधनकारक, वाहतुकीवरही प्रतिबंध

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे. १ जूनपासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात अजूनही ब-याच भागात टॅगिंग सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही गाय आणि म्हैसवर्गीय १८ लाख ८७६ जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली. टॅगिंग न केल्यास जनावराची विक्रीच करता येणार नाही. त्यामुळे पशुपालकांना टॅगिंग करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे कान टॅगिंग रेकॉर्ड करते. त्यामुळे जनावरांची जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होणार आहे. शिवाय आपत्ती काळात जनावर दगावल्यास अनुदान मिळवण्यासाठी हा टॅग आवश्यक असणार आहे. जनावरांचे टॅगिंग नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पशुपालकांना आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिका-यांंशी संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एनडीएलएम नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीत पशुपालकांकडील सर्व पशुधनास इअर टॅगिंग (कानातील पिवळा बिल्ला) केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाईन करून घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पशुपालकांनी आपल्या जनावरांचे टॅगिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांचे एअर टॅगिंग केल्याने सर्व पशुधनाची प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सर्व पशुधनास कानात टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणलीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिका-यांनी दिली.

तात्काळ टॅगिंग करून घेणे आवश्यक
पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे कानात बिल्ले मारुन घेण्यासाठी त्वरित आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाच्या आवाहनानंतर किती पशुपालक आपल्या जनावरांच्या कानाला टॅगिंग करून घेतात, हे पाहणे महत्वाचे आहे. टॅगिंग न केल्यास जनावराची खरेदी-विक्री बंद होणार असल्याने पशुपालकांनी टॅगिंग करण्याशिवाय पर्याय नाही

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR