22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातल्या कंपन्या गुजरातला पळवल्या

राज्यातल्या कंपन्या गुजरातला पळवल्या

पुणे : हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरेफोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केला आहे..पुण्यातील सारसबागेसमोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रिया सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचे आणखी एक अपयश समोर आलं आहे. कारण फॉक्सकॉन प्रकल्पही पुण्यात येणार होता मात्र तो आला नाही.

अनेक उद्योग आपल्या राज्यातून दुस-या राज्यात जात आहेत. हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून सुरू झाले. त्यात फेज-१, फेज -२, फेज-३ असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले. यासाठी देशातून लोक आले गुंतवणूक केली. मात्र आज तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वजण पाहात आहेत असा आरोप त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR