25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयसोने तस्करीत एअर हॉस्टेसला अटक

सोने तस्करीत एअर हॉस्टेसला अटक

प्रायव्हेट पार्टमध्ये लपविले होते १ किलो सोने

नवी दिल्ली : अलीकडेच एक सिनेमा रिलीज झाला होता. ही फिल्म एक फ्लाइट अटेंडेंट सोने तस्करीवर बनविण्यात आली. सिनेमाप्रमाणेत रिअल लाईफमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. केरळच्या कन्नूर विमान तळावर एअर इंडियाच्या एअर हॉस्टेसला अटक करण्यात आली आहे. केबिन क्रूकडे जवळपास १ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

सीक्रेट माहितीनुसार, डीआरआयच्या अधिका-यांनी कोलकाता येथील सुरभी खातून हिला तेव्हा थांबवले जेव्हा ती मस्कटहून उड्डाण घेऊन आली होती. तिची पडताळणी केली तेव्हा तिने प्रायव्हेट पार्टमध्ये ९६० ग्राम सोने लपविले होते. खातूनला अटक करून कोर्टात हजर केले तेव्हा तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. डीआरआयच्या अधिका-यांनी सांगितले की, मस्कटहून येणा-या एअर इंडियाच्या विमानातून केबिन क्रूच्या माध्यमातून सोने तस्करी होणार असल्याची आम्हाला गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही जेव्हा ही फ्लाईट आली तेव्हा तपासणी केली. त्यात एअर हॉस्टेस सुरभी खातून हिने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलेले जवळपास १ किलो सोने जप्त करण्यात आले. आता तिच्या सहका-यांकडून आणि सोने तस्करीत सहभागी नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.

सूत्रांनुसार, सुरभीने चौकशीत काही नावांचा खुलासाही केला. ज्या लोकांनी सुरभीला या कामासाठी पैसे दिले होते. सोने तस्करीसाठी तिला कमिशन दिले जात होते. आता सुरभी तपास अधिका-यांच्या जाळ्यात अडकली असून तिच्यासोबत आणखी कुणी केबिन क्रू यात सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे सोने तस्करी प्रकरणी आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR