21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरआव्हाड व मनुस्मृती संदर्भात पिपल्स रिपब्लिकन पक्षाची संतप्त निदर्शने

आव्हाड व मनुस्मृती संदर्भात पिपल्स रिपब्लिकन पक्षाची संतप्त निदर्शने

सोलापूर : पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या महाड येथील आदोलनामध्ये डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची विटंबना केली त्या बद्दल निदर्शने करण्यात आली. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांना मनुस्मुती च्या विरोधात आंदोलन करत असताना त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा फाडून विटंबना केली आहे. ही बाब डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या तमाम लोकांना आवडलेली नाही.

ही बाब जाणून बुजून झाल्याची भवना निर्माण झाली आहे. तेव्हा जितेंद्र आवाड यांना या बाबत काठोर शिक्षा होणे आवश्यक असून गुन्हा दाखल होवून त्यांना अटक करण्यात यावी. तसेच शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीच्या अमानवी अनैसर्गीक विचार तत्व म्हणून मानणाऱ्या मनुच्या ग्रंथातील काही श्लोक शालेय पाठ्यपुस्तका मध्ये सामाविष्ट करण्याचा महाराष्ट्र सरकाने घाट घातलेला आहे. मनूस्मृती शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केल्याने बालकांच्या मनावर भेदाभेद व विषमता जपणारे विचार रुजले जातील म्हणून अभ्यासक्रमा मध्ये न आणता ते थांबवावे असे आवाहन करण्यात आले.

या निदर्शनाचे नेतृत्व राजभाऊ इंगळे यांनी केले या प्रसंगी निदर्शनामध्ये अनिल सोनकांबळे, अंकुश मडीखांबे, महेश कांबळे, शाहू हत्तेकर, अ‍ॅड लौकीक इंगळे, शारदा वाघमारे, रवि क्षिरसागर, रजाक शेख, मनुद्दीन बागवान, सैफन शेख, गौरव इंगळे, धनजंय निकंबे, आदिंचा समावेश होता . निदर्शने यशस्वी करण्या मध्ये नागेश चिलवेरी, दत्तात्रय सर्वगोड, अजय कोकरे, सुरज पाटील, रितेश इंगळे आदिंनी परिश्रम केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR