25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयअरुणाचलमध्ये भाजप सिक्कीममध्ये पुन्हा क्रांतीकारी मोर्चाची सत्ता

अरुणाचलमध्ये भाजप सिक्कीममध्ये पुन्हा क्रांतीकारी मोर्चाची सत्ता

इटानगर : वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपने एकहाती सत्ता मिळविली. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने सलग दुस-यांदा विजयश्री खेचून आणली. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या ६० जागा आहेत. यापैकी ४६ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता काबीज केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ३ जागांवर विजय मिळविला.

अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या ६० जागा आहेत. सर्वच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून, यात भाजपने थेट ४६ जागांवर विजय मिळवित अरुणाचल प्रदेशात सत्ता काबीज केली. याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीने ५ जागांवर विजय मिळविला. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने २ जागांवर विजय मिळविला. तसेच अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशात ३ जागा जिंकल्या, तर २ जागांवर काठावर पराभव झाला. तसेच काँग्रेसने १ जागा जिंकली.

अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण १५ उमेदवार उभे होते. यापैकी ३ जण निवडून आले आहेत तर एक उमेदवार २ मतांनी पडला. दुसरा उमेदवार २०० मतांनी पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्र्रफुल्ल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशातील विजयाबद्दल अभिनंदन केले. राज्यात पक्षाला एकूण १० टक्के मते पडली आहेत, असे ते म्हणाले.

अरुणाचल प्रदेश : एकूण ६० जागा
पक्षीय बलाबल
भाजप : ४६
नॅशनल पीपल्स पार्टी : ५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : ३
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल : २
काँग्रेस : १
अपक्ष : ३

क्रांतीकारी मोर्चाचा एकतर्फी विजय
मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने (एसकेएम) सिक्कीम विधानसभा निवडणुकीत ३२ पैकी १७ विधानसभा जागांवर बहुमताचा आकडा पार करीत सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने ३२ पैकी ३१ जागांवर विजय मिळविला. विरोधी सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रंटला फक्त १ जागा मिळाली. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा सध्या मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आहे. जनतेने पुन्हा त्यांच्यावरच विश्वास दाखविला. भाजप आणि कॉंग्रेसची येथे ताकद कमी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR