21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमाढ्यात धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर, भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर

माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर, भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर

सोलापूर : माढ्याच्या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये प्राथमिक कलांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी त्यांची थेट लढत पाहायला मिळाली.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील खासदारकीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं.

पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. २००८ मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली. तेव्हा शरद पवार इथून निवडून आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR