31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयसहस्त्रतालमध्ये अडकलेल्या ८ ट्रॅकर्सचा मृत्यू

सहस्त्रतालमध्ये अडकलेल्या ८ ट्रॅकर्सचा मृत्यू

उत्तरकाशी : उत्तरकाशी-टिहरी जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे १४,५०० फूट उंचीवर असलेल्या सहस्त्रतालमध्ये अडकलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आणखी चार ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ ट्रॅकर्सना आपला जीव गमवा

वा लागला आहे. तर दहा ट्रॅकर्सना एअरलिफ्ट करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
२९ मे रोजी २२ सदस्यीय ट्रॅकरचा गु्रप मल्ला-सिल्ला येथून कुश कुल्यान बुग्याल मार्गे सहस्त्रताल ट्रेकिंगसाठी निघाले होते. यात चार ट्रॅकर्सचा थंडीमुळे मृत्यू झाला. तर १८ ट्रॅकर्स अडकले होते, त्यापैकी आज आणखी चार ट्रॅकर्सचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून हवाई दलाच्या दोन चेतक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दहा ट्रॅकर्सना सुरक्षितपणे आणण्यात आले आहे.

जिल्हा दंडाधिकारी डॉ. मेहरबान सिंग बिश्त यांनी सांगितले की, सहस्त्रतालच्या ट्रेकिंग मार्गावर अडकलेल्या ट्रॅकर्सना वाचवण्यासाठी एसडीआरएफ आणि वन विभागाचे बचाव पथक वेगवेगळ्या दिशांनी घटनास्थळी गेले आहेत. सिल्ला गावातून वनविभागाचे दहा सदस्यांचे रेस्क्यू आणि बचाव पथक पुढे गेले आहे. तर उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयातील एसडीएफ पथकानेही टिहरी जिल्ह्यातील बुधाकेदार येथून बचावकार्य सुरू केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR