22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपराभवाची जबाबदारी सर्वांचीच...

पराभवाची जबाबदारी सर्वांचीच…

रावेर : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना रक्षा खडसे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

कुठल्याही संघटनेत काम करताना सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. चांगले काम झाले की त्याचे श्रेय सगळे घेतात आणि अडचण आली तर इतरांवर अपयश लोटले जाते, अशातच या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात आलेल्या अपयशाची जबाबदारी माझ्यासह सगळ्यांची आहे. मात्र, असे असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

हा त्यांचा मोठेपणा आहे. मात्र, आजपर्यंत त्यांनी सरकारमध्ये राहूनही अनेक चांगली कामे केली असल्याने, त्यांनी यापुढेही अशाच पद्धतीने काम केले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा देऊ नये, असे आपल्यालाही वाटत असल्याची प्रतिक्रिया रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विजयी उमेदवार रक्षा खडसे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR