24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रदुस-या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस

दुस-या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस

मराठवाड्यात मध्यम ते हलका पाऊस, विदर्भात जोर वाढला
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्याला मान्सूनची चाहुल लागलेली असतानाच राज्यात ब-याच भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विदर्भात आज सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे, तर मराठवाड्यातही काही भागात मान्सूनपूर्व पावसाने सलग दुस-या दिवशी हजेली लावली. नांदेड, परभणीत आज ढगाळ वातावरण होते, तर लातूर जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस झाला तर बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. बीडमध्येही काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारीही जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

मराठवाड्यात बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. या अगोदर गुरुवारी सायंकाळीही ब-याच भागात जोरदार पाऊस झाला. अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. परंतु ब-याच भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यात ब-याच ठिकाणी साधारण पाऊस झाला. परंतु औसा तालुक्यातील ब-याच भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले, तुडुंब भरून वाहिले. विदर्भातही ब-याच भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. याशिवाय नाशिक, दिंडोरी भागातही आज जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर वाढल्याने ब-याच ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात
वीज पडून २ ठार
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सोलापुरात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. याशिवाय दोन शेळ््या दगावल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळळी गावात वीज कोसळल्याने आमसिद्ध गायकवाड (६७) आणि त्यांच्या दोन शेळ्याही दगावल्या. कुंभारी गावात बिळेणी डक्के या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने वृद्ध व्यक्ती जखमी झाली. जिल्ह्यातील ९१ पैकी ८२ महसुली मंडळांत ५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. नरखेड परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR