22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeनांदेडनांदेडात विक्रीसाठी आणलेले ३ गावठी पिस्तुल जप्त

नांदेडात विक्रीसाठी आणलेले ३ गावठी पिस्तुल जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची कारवाई

नांदेड : प्रतिनिधी
गावठी पिस्तुल विक्रीसाठी नेणा-या तिघांना येथील वजिराबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांना पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असून सदर घटनेची माहिती पोलिसांनी शनिवार दि. ८ जून रोजी प्रसारमाध्यमांना दिली.

दरम्यान वजिराबाद गुन्हे शोध पथकाने सदर तीन गुन्हेगारांना पकडून तीन गावठी पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे ७ जून रोजी पकडली. पोलिस अंमलदार विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ७ जून रोजी पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. डी. वटाणे व त्यांच्या सहका-यांनी आरोपींचा शोध घेत असताना हिंगोली गेट जवळ दोन जणांकडे पिस्तुल असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे गोपाल सुदर्शन चव्हाण रा. दत्तनगर तामसा ता. हदगाव जि. नांदेड ह.मु.नमस्कार चौक नांदेड, शुभम राजूसिंह परदेशी (२४) रा. समर्थनगर, शोभानगरजवळ नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. त्या दोघांनी दिलेल्या माहितीवरुन मनोज मोहन मोेरे (२०) रा.कारेगाव ता. लोहा जि. नांदेड यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे सापडली.

या तिघांना रणविरसिंग उर्फ शेरा उर्फ टायगर रा.देवनगर तांडा ता. घनसांगवी जि. जालना याने विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. वजिराबाद पोलिसांनी या तक्रारीवरुन या प्रकरणात सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी वजिराबाद पोलिसांना तांत्रिक मदत केली आहे. पकडलेले तीन पिस्टल आणि पाच जीवंत काडतुस यांची किंमत १ लाख २२ हजार ५०० रुपये दाखविण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR