29.7 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रबारामतीमध्ये अजित पवार यांना डिवचणारे बॅनर्स

बारामतीमध्ये अजित पवार यांना डिवचणारे बॅनर्स

पुणे : प्रतिनिधी
युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासून सुरू आहे. त्यातच आता बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले. बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून अजित पवार यांना डिवचले आहे.

दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा पराभव झाला. शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केला. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांचा विधानसभेत कस लागणार आहे. त्याचवेळी शरद पवार गटाकडूनही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. अजित दादांऐवजी नवीन दादा तयार केला गेला आहे. अजित पवार यांना डिवचणारे बॅनर्स त्यासाठी बारामतीमधील सुपामध्ये लावण्यात आले आहे. ‘वादा तोच दादा नवा’, असे बॅनर्स लावले आहेत. त्यात बारामतीचा नवीन दादा युगेंद्र पवार यांना म्हटले गेले आहे. यामुळे विधानसभेत पुन्हा पवार गटात लढाई जुंपणार आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनातून साधला निशाणा
सुप्रिया सुळे यांच्या विजयाची बारामतीमधील सुपा येथे बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनर्सवर ‘वादा तोच दादा नवा’ असे लिहिले असून युगेंद्र पवार यांचा फोटो लावला आहे. तसेच ‘हर वार का पलटवार हूँ मै, यूंही नही कहलाता शरद पवार हूँ मै’ असे वाक्य लिहून सुप्रिया सुळे यांचे चौथ्यांदा विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. या बॅनर्सची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR