27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeजरांगे यांच्याविरोधात अपशब्द वापरणा-या तिघांवर गुन्हा दाखल

जरांगे यांच्याविरोधात अपशब्द वापरणा-या तिघांवर गुन्हा दाखल

संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अपशब्द वापरणा-या तिघांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी शिरूर शहर बंद करण्यात आले होते. या बंदमध्ये जे भाषण करण्यात आले त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. या वक्तव्यावरुन माजी जि.प. सदस्य दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बडे व इतर प्रमुख १५ ते २० जणांविरुध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हनुमान मुळीक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, मनोज जरांगे पाटील यांच्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शिरूर मधल्या या तीन व्यक्तींनी केला. तसेच इतर लोकांनी सुद्धा त्यांना या संदर्भात सहकार्य केले, त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR