पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार या तिघांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालचा मुलाचे रक्ताचे सॅम्पल कुठे फेकले? ते सॅम्पल नेमके कुणी फेकले? यात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. केसच्या मुळाशी जाणे गरजेचे नाहीतर चुकीचा संदेश जाईल असे म्हणत ही कोठडी वाढवून देण्यात आली आहे. या चार दिवसातील तपासात काही नवीन गोष्ट समोर येण्याची शक्यता आहे. नव्या गोष्टी समोर आल्या तर आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केले जाऊ शकते आणि त्यांची पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांच्यासह अश्फाक मकानदार या तिघांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे सॅम्पल कुठे फेकले? ते सॅम्पल नेमके कुणी फेकले? यात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार या तिघांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे दोघेही कोर्टात हात जोडून उभे होते. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालने आम्हाला फक्त एम सी आर मिळाला तर बरं होईल, असं म्हणताच एम सी आर म्हणजे काय?, असे कोर्टाने विचारले. त्यावेळी विशाल
अग्रवालच्या आईने माहिती नाही असे उत्तर दिले.
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ४ लाख रुपये दिले, मात्र ३ लाख रुपये श्रीहरी हळनोरकडून पोलिसांना मिळाले. त्यातले एक लाख कुठे गेले? आता पोलीस हे एक लाख रुपये कुठे गेले याचा शोध घेणार आहेत. आरोपी अश्फाक मकानदार गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. त्यादरम्यान त्याला कुणी मदत केली का? तो कुठे वास्तव्यास होता? याचा तपास पोलिस करणार आहेत. अश्फाक मकानदार याला अग्रवाल दाम्पत्याने कामाचा मोबदला म्हणून काही आर्थिक फायदा पोहोचविला आहे का? याचा शोध पोलिस घेणार आहेत.
विशाल, शिवानी अग्रवालवर पोलिसांचा संशय
विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचा नमुना पुरावा नष्ट केल्याचा दाट संशय पोलिसांना असून, हा रक्त नमुना कुठे आणि कसा नष्ट केला कुणाच्या सांगण्यावरून केला याबाबत तपास पोलिस करणार आहेत. अश्फाकने कुणाच्या सांगण्यावरून अग्रवाल दाम्पत्याला मदत केली? याचा शोध पोलिस घेणार आहेत. आरोपी विशाल हा आश्फाक, डॉ. तावरे आणि डॉ. श्रीहरी संपर्कात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.