17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमी मरेपर्यंत शरद पवारांसोबत

मी मरेपर्यंत शरद पवारांसोबत

बीड : बीडच्या बप्पाचा दादांना फोन असे टविट् अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांनी मंगळवारी केले होते. यानंतर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी हा दावा धुडकावून लावत आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहू, असे स्पष्ट केले आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी बीडच्या बप्पाचा दादांना फोन अशा आशयाचे ट्वीट केले होते. यामुळे बीडचे खा. सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही खासदार फुटीची भीती आहे का, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, या प्रकरणावर बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण देत, मी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार असे स्पष्ट केले आहे. मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता. त्यानंतर त्यांनी दुस-याच्या बाबतीत बोलावे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरदचंद्र पवार यांच्यासोबतच आपण राहणार असून असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार मिटकरी यांनी बंद करावेत, त्यांनी आधी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आणावा असा टोलाही सोनवणे यांनी लगावला.

मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो. ते असा संभ्रम का पसरवत आहेत, हे त्यांनाच विचारायला हवे. ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्युज का करत आहेत. या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक विचार असतात, ते तुम्ही राजकारणात आणत आहात. हे मिटकरी अतिशय चुकीचे करत आहेत. मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिले आहे, हे मला माहित नाही, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावे आणि त्यानंतर दुस-यांच्या उष्टीला हात घालावा ही विनंती आहे. मी जिवंत असेपर्यंत मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार असे स्पष्टीकरण सोनवणे यांनी दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR