25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeराष्ट्रीयमोदींचे मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’

मोदींचे मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’

मोदींच्या मंत्रिमंडळातील घराणेशाहीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे मिळाले तर देशात इंडिया आघाडीलाही चांगलच यश लाभले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने २९३ जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीला २३४ जागांवर यश प्राप्त झाले. त्यामुळे, नरेंद्र मोदींनी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेसकडून राहुल गांधींचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्तावित आहे.

त्यातच, निवडणूक प्रचारात घराणेशाहीच्या मुद्दयावरुन नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. तर, नरेंद्र मोदींकडून शहजादे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केले जाते. मात्र, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात तब्बल २० नेते घराणेशाहीतून आलेले आहेत. स्वत: राहुल गांधींनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली, तसेच ‘परिवार मंडल’ असे म्हणत राहुल गांधींनी भाजप व नरेंद्र मोदींवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिस-यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींसमवेत तब्बल ७२ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून महाराष्ट्रातून ६ जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यात, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार आणि ३ राज्यमंत्रीपद मिळाली आहेत. त्यामध्ये, भाजप नेते नितीन गडकरी व पियुष गोयल हे पुन्हा एकदा मंत्री बनले असून रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. रक्षा खडसे दुस-यांदा खासदार बनल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहेत. मात्र, रक्षा खडसेंना मिळालेली मंत्रीपदाची संधी ही घराणेशाही असल्याचे स्वत: राहुल गांधींनी म्हटले आहे. तर, मंत्री पियुष गोयल यांचे वेद प्रकाश गोयल हेही मंत्री राहिले आहेत.

काँग्रेस हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे, घराणेशाही जगवायचे काम काँग्रेसकडून होते. लांगुलचालन आणि घराणेशाहीवरुन मोदींनी अनेकदा राहुल गांधींना लक्ष्य केले. मात्र, आता भाजपमध्येच कशी घराणेशाही आहे हे राहुल गांधींनी दाखवून दिले आहे. मोदी सरकारमध्ये नव्याने शपथ घेतलेले तब्बल २० मंत्री आहेत, ज्यांना राजकीय वारसा आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील रक्षा खडसे आणि पियुष गोयल यांचेही नाव आहे.

घराणेशाहीवाले मंत्री
– एच.डी. कुमारस्वामी
– ज्योतिरादित्य शिंदे
– किरण रिजेजू
– रक्षा खडसे
– जयंत चौधरी
– चिराग पासवान
– जेपी नड्डा
– कमलेश पासवान
– रामनाथ ठाकूर,
– राममोहन नायडू
– जितीन प्रसादा
– शंतनू ठाकूर
– राव इंद्रजीत सिंग
– पियुष गोयल
– किर्ती वर्धन सिंग
– विरेंद्रकुमार खाटीक
– रवणीत सिंग बिट्टू
– धर्मेंद्र प्रधान
– अनुप्रिया पटेल
– अन्नपूर्णा देवी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR