34.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रआईस्क्रीम कोनमध्ये सापडले मानवाचे बोट

आईस्क्रीम कोनमध्ये सापडले मानवाचे बोट

महिलेची पोलिसांत धाव

 

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील मालाड परिसरात एक भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये चक्क मानवी बोट सापडले. यानंतर महिलेने मालाड पोलिस ठाण्­यात धाव घेत तक्रार दिलीअसल्याचे वृत्त आहे.

मालाड परिसरातील एका महिलेने आईस्क्रीमची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. यानंतर महिलेने मालाड पोलिस ठाण्यात धाव घेतली..

मालाड पोलिसांनी संबंधित आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून आईस्क्रीम तपासासाठी पाठवले आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेले मानवी अवयव पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवले असल्याचे मालाड पोलिसांनी सांगितले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR