33 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रकळव्यात इमारतीचा स्लॅब पडून तीन जण जखमी

कळव्यात इमारतीचा स्लॅब पडून तीन जण जखमी

ठाणे : प्रतिनिधी
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समिती हद्दीतील भुसार आळीमधील ओमकृष्ण को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत तिस-या माळ्यावरील स्लॅब दुस-या माळ्यावर पडल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यामुळे ठाण्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न समोर आला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात येतात तसेच धोकादायक इमारती सील करून रहिवाशांना ठामपा निवासी गृहात पाठवण्यात येते.

परंतु पावसाळा जवळ आला तरी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अद्यापही जुन्या आणि धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आल्या नसल्याने कळव्यामधील ३५ वर्षे जुनी ओम कृष्ण को-ऑप. हाऊसिंग सोसायटी इमारतीचा बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास तिस-या मजल्यावरील स्लॅब दुस-या मजल्यावर कोसळला यामध्ये मयूर दांडेकर (४०), मनोहर दांडेकर (७०), मनीषा दांडेकर (६५ ) हे तीन जण जखमी झाले असल्याने तिघांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR