23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांमुळे नुकसान नाही, उलट भाजपची मते वाढली !

अजित पवारांमुळे नुकसान नाही, उलट भाजपची मते वाढली !

मुंबई : (प्रतिनिधी)
सरकारकडे पूर्ण बहुमत असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले. वैचारिक विरोधकांना सोबत घेऊन भाजपने स्वत:चीकिंमत कमी करून घेतली, अशी जळजळीत टीका रा. स्व. संघाच्या मुखपत्रातून करण्यात आल्याने भाजपाची चांगलीच पंचाईत झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, अजित पवारांना घेऊन भाजपचं कोणतही नुकसान झालेलं नाही. उलट २०१९ च्या तुलनेत भाजपची मतं वाढली असल्याचा दावा केला आहे. संघाच्या मुखपत्रातील टीकेने राष्ट्रवादीत तिखट प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपाचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादा मुळे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष कोणावर आहे हे समजून घ्या..लिहता आणि बोलता आम्हाला पण येते लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ह्लआर्गनायजरह्व या मासिकातून या पराभवाची समीक्षा करताना भाजपची तिखट शब्दात कानउघडणी करण्यात आली आहे. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली. त्यामुळेच महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला आहे. भाजपमधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्वत कळते या मोठ्या भ्रमात राहिले आहेत. भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही. त्यांनी नि:स्वार्थपणे काम करणा-या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. आयारामगयारामांना घेऊन भाजपने राज्यातील वर्चस्व कमी केले आहे, असे परखड बोल संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचा पलटवार !
आर्गनायजर मधील टीकेला राष्ट्रवादीने प्रत्त्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादा मुळे.महाराष्ट्राच्या जनतेचा कौल,रोष कोणावर आहे हे समजून घ्या..लिहता आणि बोलता आम्हाला पण येते लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका,असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यात पराभव झाला असल्याकडे लक्ष वेधतात राष्ट्रवादीमध्ये फटका बसल्याचा आरोप फेटाळून लावला. राष्ट्रवादीतून आलेल्या प्रतिक्रियेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, अजित पवारांना घेऊन भाजपचं कोणतही नुकसान झालेलं नाही. याउलट २०१९ च्या तुलनेत भाजपची मतं वाढली आहेत, अशी सारवासारव केली. २०१९ च्या तुलनेत मतं वाढली पण जागा कमी झाल्या हे सत्य आहे. महाविकास आघाडीतील लोक हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. मात्र, ंिजकलेल्या असतील तिथे ईव्हीएमवर संशय का घेत नाहीत, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR