18.6 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निकालात जरांगेंचा इम्पॅक्ट नाही ; हाकेंचा हल्लाबोल

लोकसभा निकालात जरांगेंचा इम्पॅक्ट नाही ; हाकेंचा हल्लाबोल

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण मागे घेतले. मात्र जालन्यातच आंदोलनाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे. जालन्यातल्या वडीगोद्री येथे ओबीसींच्या हक्कांसाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंचा इफेक्ट अजिबात दिसला नाही, असे म्हणत जरांगेंना संविधानाबद्दल काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

अंतरवाली सराटी येथे सहा दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे. ३० जूनपर्यंत सरकारला वेळ देऊन सगेसोय-याच्या अंमलबजावणीचा शब्द त्यांनी सरकारकडून घेतला.

लक्ष्मण हाके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात जरांगेंचा इफेक्ट चालला, असे म्हणता येणार नाही. तसे असते तर मंगेश साबळेंना दीड लाख मते पडली नसती. साबळेंना मतदान करू नका, असे आवाहन जरांगेंनी केले होते, असेही हाके म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR