23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजी-७ शिखर परिषदेपूर्वी इटालियन संसदेत गोंधळ

जी-७ शिखर परिषदेपूर्वी इटालियन संसदेत गोंधळ

रोम : पुन्हा एकदा जगभरातील लोकांच्या नजरा जी-७ शिखर परिषदेकडे लागल्या आहेत. यावेळी हा सोहळा इटलीत होत आहे. मात्र, शिखर परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत मोठा गदारोळ झाला.

सत्ताधारी आणि विरोधकांचे खासदार एकमेकांना भिडले असून, त्यांच्यात जोरदार हाणामारीही झाली. यात फाईव्ह स्टार मूव्हमेंटचे डेप्युटी लिओनार्डो डोनो जखमी झाले. संसदेतील वादामुळे देशातील राजकीय तणाव वाढला आहे.

बुधवारी संध्याकाळी संसदेत जेव्हा फाईव्ह स्टार मूव्हमेंटचे डेप्युटी लिओनार्डो डोनो यांनी स्वायत्तता समर्थक नॉर्दर्न लीगचे मंत्री रॉबर्टो कॅल्डरोली यांच्या गळ्यात इटालियन ध्वज बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाद सुरू झाला. डोनो यांनी स्वायत्तता देण्याच्या योजनेला विरोध दर्शवण्यासाठी हा प्रकार केला होता. मीडियासह अनेक विभागांनी संसदेतील या घटनेला इटलीची एकता कमकुवत करणारी घटना असे म्हटले आहे. या घटनेचा
व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR