24.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeलातूरस्मार्ट मीटर बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू

स्मार्ट मीटर बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू

लातूर : प्रतिनिधी
जनतेला नुकसानीत टाकणारे स्मार्ट मीटर बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू, असा इशारा आम आदमी पार्टीकडून महावितरणला देण्यात आला आहे.  महाराष्ट्रात सक्त्तीचे केले गेलेले, विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास महाराष्ट्रातील जनतेकडून कडाडून  विरोध होत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व एम एस ई डी सी एल यांच्या सहाय्याने देशातील अदानी सारख्या काही भांडवलदारी कंपन्या करत आहे. या अनुषंगाने आम आदमी पार्टी लातूरचे जिल्हाध्यक्ष श्री. आश्विन नलबले यांनी महावितरण अधिक्षकाला  तातडीने स्मार्ट मीटर बसविणे बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू, असा निवेदन वजा इशारा दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले, महासचिव सुमित दीक्षित, जिल्हा संघटक अमित पांडे, जिल्हा संघटक आकाश मोठेराव, जिल्हा संघटक ओंकार गोटेकर , जिल्हा सहसचिव आकाश कांबळे, मोहम्मद रफीक शेख. साहिल तांबोळी, आनंदा कामगुंडा , शिरूर अनंतपाळ तालुका उपाध्यक्ष अंकुश लोंढे, जिल्हा युवा अध्यक्ष नरेश तौर पाटील, दानिश शेख , आश्रुबा नरंिसगे, अब्दुल शेख, विश्वकर्मा शंके, आदित्य सोमवंशी, करण बनसोडे, अक्षय गायकवाड ,विवेक वाघमारे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR