23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रनगरमध्ये शेअर मार्केट स्कॅम १००० कोटीपेक्षा जास्त फसवणूक

नगरमध्ये शेअर मार्केट स्कॅम १००० कोटीपेक्षा जास्त फसवणूक

अहमदनगर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार शेवगाव तालुक्यात उघडकीस आला. महिन्याला १२ ते १५ टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात २०० पेक्षा जास्त एजंट तयार झाले. या तालुक्यातील ११० खेडेगावातून करोडोची माया जमवत यातील काही एजंट आता फरार झाले आहेत.

मागील चार वर्षांपासून शेअर मार्केटचा हा काळा बाजार शेवगाव तालुक्यातील खेडोपाडी सुरू होता. दर महिन्याला १२ ते १५ टक्के परतावा देतो असे आमिष दाखवून जवळपास २०० पेक्षा जास्त एजंट्सने शेवगाव शहरात आपला काळा धंदा सुरू केला होता. या एजंट्सने दाखवलेल्या आमिषाला बळी पडून लोकांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते. या एजंट्सने सुरुवातीला लोकांना परतावा दिला. नंतर मात्र हेच एजंट्स आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावातून पळून गेले आहेत. मागील ४ वर्षांपासून हा गोरखधंदा शेवगाव तालुक्यात सुरू होता. जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा दावा केला जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे. गदेवाडी येथील इन्व्हेस्ंिटग डॉट कॉम या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणा-या दोन सख्या भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच इतर एजंट नॉट रिचेबल झाले असून काहींनी धूम ठोकली आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ माउली अशोक धनवडे या शेतक-याने शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून या प्रकरणातील एका एजंटला पोलिसांनी सुरुवातीला आर्म अ‍ॅक्ट नुसार ताब्यात घेतले आणि नंतर त्याच्यावर कलम ४२० प्रमाणे देखील गुन्हा दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR