28.5 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरगरुड चौकाचे ‘मौत का कुआँ’ चौक नामकरण

गरुड चौकाचे ‘मौत का कुआँ’ चौक नामकरण

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण कडून रस्ता क्रमांक ३६१ मार्ग नव्याने विकसित करण्यात आला. गरुड चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत ७ किलोमीटर बा वळण मार्ग संबंधित गुत्तेदाराकडून विकसित कामात या रिंग रोड मार्गावरील पथ दिवे बंद आहेत. शिवाय या मार्गावर अर्धवट काम व त्रुटी असल्याने सदरील मार्गवर नेहमी जीवघेणे कायम अपंगत्व अपघात होत आहेत. सदरील मार्ग हा अपघात प्रणवक्षेत्र झाल्याने लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या वतीने अपघात नियंत्रण उपाययोजना करीता लातूर जिल्हाधिकारी लातूर, राष्ट्रीय राज्य प्राधिकरण कार्यालय नांदेड व लातूर, प्रकल्प संचालक, मनपा आयुक्त यांच्याकडे सतत निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून सदरील मार्गावर अपघात नियंत्रण ठेवण्यासाठी गरुड चौका सह या मार्गावरील सिग्नल सुरु करावेत, या मार्गातील चौकात गतिरोधक बसवावेत, गरुड चौकात पोलीस मदत केंद्र सुरू करावे गरुड चौकातील अपघातास कारणीभूत जास्तीचे १० फुटाचा दुभाजक कमी करावे, करीम नगर, राहीम नगर, महादेव नगर, प्रबुद्ध नगर भागातील नागरिकांना रहदारी करिता परंडेकर पेट्रोल पंप समोरून दुभाजकातुन मार्ग द्यावा,

गरुड चौकातील एका बाजूला सरकलेला गोल वर्तुळ काढून, गरुड चौकाची ओळख गरुड पुतळा पूर्ववत बसवून वायू प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे कारंजे बसवावेत, बा रिंग रोडवरील सर्व पथदिवे सुरू करावेत व या मार्गातील सर्विस रोडवरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीचे निवेदने देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आज लातूर शहर पूर्व भाग कृती समितीच्या वतीने दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून गरुड चौकाचे मोत का कुवा नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. लावण्यात आलेल्या फलकांवर रस्ते विकास कामातील चुका मुळे गरुड चौक व सदरील मार्ग अपघात प्रणवक्षेत्र झाले असून गरुड चौक बनला मोत का कुवा वाहने सावकाश चालावा असा मजकूर छापून गरुड चौकात तिन्ही बाजूनी हलक्या वाजवत पाच बाय दोन फूट साईजच्या फलकाचे अनावरण करीत प्रशासन या समस्येवर उपाय योजना राबवित नसल्याने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला .

लवकरच सकारात्मक कार्यवाही नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे, सचिव बाबासाहेब बनसोडे, शंकर जाधव, वंचितचे अ‍ॅड. रोहित सोमवंशी, भगवेश्वर धनगर, सचिन चव्हाण, चंद्रप्रकाश बगडे, नंदकिशोर गंगणे, सुरेश संगापुडे, नागेश पवार, गौतम ससाणे, अमोल गायकवाड, गणेश घोडके, डॉ बालाजी रणक्षेत्रे, योगेश डोंगरे, शिधू कांबळे, समीर तांबोळी, मनोज सौदागर, बाबा धनगर, मेजर सूर्यवंशी, मनोज धनगर, गजानन कांबळे, महेबुब शेख, विनोद गंगणे, दिगंबर कसबे, सचिन पडिले, सदाशिव चाफेकर, विजय बनसोडे, बाबू धनगर, इत्यादीने दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR