25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeराष्ट्रीयमानवी बोटानंतर आता अमूल आईस्क्रीमध्ये सापडली गोम

मानवी बोटानंतर आता अमूल आईस्क्रीमध्ये सापडली गोम

नवी दिल्ली : नोएडातील एका महिलेने दावा केला आहे की, तिने ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे ऑर्डर केलेल्या आइस्क्रीममध्ये तिला गोप आढळली आहे. याबाबतची माहिती अन्न सुरक्षा अधिका-यांनी दिली असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

१५ जून रोजी वरील एका पोस्टमध्ये, दीपा देवी नावाच्या महिलेने एका लोकप्रिय ब्रँडच्या आइस्क्रीममध्ये गोम असल्याचा फोटो शेअर केला. यावेळी त्या महिलेने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आवाहन केले. नोएडा अन्न सुरक्षा विभागाने तपासणीसाठी डिलिव्हरी कंपनीच्या स्टोअरमधून ब्रँडच्या आईस्क्रीमचे नमुने गोळा केले आहेत, असे अधिका-यांनी सांगितले.

मुख्य अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय गोयल यांनी पीटीआयला सांगितले की नमुने घेण्यात आले असून, ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आम्ही अन्न सुरक्षा कायदा, २००६ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया करत आहोत. ते म्हणाले की अन्न सुरक्षा विभागाने महिलेच्या सोशल मीडिया पोस्टची स्वत:हून दखल घेतली आणि तिच्याशी संपर्क साधला.

अधिका-याच्या म्हणण्यानुसार, आईस्क्रीमवर पॅकेजिंगची तारीख १५ एप्रिल २०२४१ आणि एक्सपायरी डेट १५ एप्रिल २०२५ होती. गोयल म्हणाले, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्रयोगशाळेचे अहवाल आल्यानंतरच सर्व तथ्यांची पुष्टी केली जाईल. नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील खाद्यपदार्थांबद्दल काही तक्रार असल्यास लोक सूरजपूर येथील अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR