लातूर : प्रतिनिधी
खोरी गल्ली, एसआर एन्टरप्रायजेस समोर, भवानी हॉस्पिटलच्या समोर सातत्याने गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी गटार ब्लॉक होऊन घाण पाणी रोडवर येत आहे. त्याचा नागरीकांना त्रास हात आहे. याबाबत मनपात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त करत मान्सून पुर्व गटारींची साफसफाई झाली नसल्याने आता पावसाळ्यात तरी गटारांची साफसफाई करावी, अशी मागणी होत आहेत. तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत खोरी गल्ली, बाबासाहेब परांजपे मार्ग येत नाही का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे.