28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणून वाघ होत नाही

लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणून वाघ होत नाही

मुंबई : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणून तो वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना, हे शिंदेंचे जे प्रकरण आहे ते काही दिवसात बंद होईल असे म्हणत बोचरी टीका केली आहे. तसेच आपला पक्ष, जो गट आहे, तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणा-या मोदी-शाहांच्या चरणांशी ठेवणे याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत असेही म्हटले आहे.

हा एक हास्यास्पद प्रकार आहे. ंिहदहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ५८ वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया रचला. ५८ वर्षांपासून बाळासाहेबांची ही शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रात आणि दिल्लीत निरंतर काम करत आहे. तेव्हापासून आमच्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. तो कोणी खाली ठेवला नाही. आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, अनेकांचे बलिदान झाले. अनेक शिवसैनिकांनी तुरूंगवास भोगला. पण आम्ही पक्षाशी ईमान कायम ठेवले. म्हणून आजही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जोमाने काम करत आहे, ठामपणे उभी आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पण कोणी म्हणत असेल की आमचीच शिवसेना खरी तर त्यांनी स्वत:ला आरशात पाहावे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत ते कुठे होते, याचा त्यांनी विचार करावा. पैशांनी मते विकत घेणार, वायकरांसारख्या विजयाची चोरी करणे याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष, जो गट आहे, तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणा-या मोदी-शहांच्या चरणांशी ठेवणं याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत. लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणून तो वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना, हे शिंदेंचे जे प्रकरण आहे ते काही दिवसात बंद होईल. आमचा उद्या मोठा कार्यक्रम असणार आहे आणि उद्धव ठाकरे तिथे मार्गदर्शन करणार आहेत असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR