28.1 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeमहाराष्ट्र  पुण्यात सलग दुस-या दिवशी पोलिस भरतीविरोधात आंदोलन

  पुण्यात सलग दुस-या दिवशी पोलिस भरतीविरोधात आंदोलन

पुणे : राज्यात आजपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले आहेत. तसेच कारागृह विभागातील भरतीसाठी १ हजार ८०० पदांसाठी ३ लाख ७२ हजारहून अधिक अर्ज आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यात पोलिस भरतीविरोधात सलग दुस-या दिवशी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारविरोधात दंडवत घालत विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

पोलिस भरतीला वय वाढवून मिळावे या मागणीसाठी पुण्यात पोलिस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. सन २०-२२ या वर्षाची पोलिस भरती २०२४ मध्ये होत आहे. २०२२ या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना या भरतीपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी वय वाढवून मिळावे या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR