26.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक पदवीधरमध्ये झिरवळांचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिक पदवीधरमध्ये झिरवळांचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिक : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवळ यांनी संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नरहरी झिरवळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, संदीप गुळवे यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याची घोषणाच नरहरी झिरवळ यांनी केली आहे. तसेच, कौटुंबिक संबंधांमुळे संदीप गुळवेंना जाहीर पाठिंबा देत असल्याचे नरहरी झिरवळ यांनी जाहीर केले आहे.

नरहरी झिरवळ महायुतीचे आमदार आहेत. तर संदीप गुळवे ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत. झिरवळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली होती.
त्यावेळी झिरवळ यांनी गुळवेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. झिरवळ यांच्याकडून संदीप गुळवे यांना आगळंवेगळं रिटर्न गिफ्ट मिळाल्यामुळे गुळवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी संदीप गुळवे यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर देखील उपस्थित होते. भेटीनंतर झिरवळ यांनी संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचे काम करण्याच्या सूचना नरहरी झिरवळ यांनी दिल्या.

पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा : झिरवळ
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संदीप गुळवे हे काँग्रेसमधून नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून ते निवडणूक लढवत आहेत. शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा देत आहे, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR